अडीज टक्के जादा टोल भरावा लागणार
महेंद्र शिंदे :
पुणे जिल्हा : खेड-शिवापूर, ता. 28 : पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे अडीज टक्के टोलवाढ करण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून ही नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे सातारा टोल रोड प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात. त्यानुसार यावर्षीही टोलचे दर एप्रिलपासून बदलले जाणार आहे. यावर्षी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलच्या दरात सुमारे अडीज टक्के टोलवाढ करण्यात आली आहे.
कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ झाली असून नवीन दरानुसार या वाहनांना 120 रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या दरातही 5 रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांना आता 190 रुपये टोल आकारला जाणार आहे. बस आणि ट्रकसाठी पूर्वी 390 रुपये टोल दर होता. त्यात 10 रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी 400 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.जड वाहनांसाठी पूर्वी 415 रुपये टोल होता. आता त्यात 5 रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता 420 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार अवजड वाहनांसाठी 630 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.
“दरवर्षी टोलचे दर बदलत असतात. त्यानुसार यावर्षीही एप्रिलपासून टोल दर बदलले असून टोल दरात सुमारे अडीज टक्के वाढ झालेली आहे.” अमित भाटीया -व्यवस्थापक ( पुणे-सातारा टोल रोड )