पुणे सातारा रस्त्यावर बेकायदेशीरपणे दुभाजक तोडले
तोडलेल्या दुभाजकांमुळे अपघाताचा धोका
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 3 : पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान अनेक हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्याचे दुभाजक तोडले आहेत. बेकायदेशीर पणे तोडलेल्या या दुभाजकांमुळे सदर ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी रस्त्यावरील दुभाजक तोडले आहेत. बेकायदेशीरपणे तोडलेल्या या दुभाजकांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या तोडलेल्या दुभाजकातून वळण्यासाठी वाहने थांबतात. ही थांबलेली वाहने लक्षात न आल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघात होतात. तरीही अनेक हॉटेल समोर बेकायदेशीर पणे हे दुभाजक तोडण्यात आलेले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे हे बेकायदेशीरपणे दुभाजक तोडण्याचा अधिकार यांना कोणी दिला. दुभाजक तोड़ून यांचे व्यवसाय चालतील मात्र त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. भविष्यात या तोडलेल्या दुभाजकामुळे अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार असा सवाल नागरीक विचारत आहेत.
याबाबत पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया म्हणाले, “या अनधिकृतपणे दुभाजक तोडल्याचे आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळवले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ग्रामीण पोलिसअधिक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे.”
रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी म्हणाले, “या अनधिकृतपणे तोडलेल्या दुभाजक बंद करण्यासाठी बंदोबस्त देण्याबाबत आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे. पोलिस बन्दोबस्त मिळाल्याबरोबर आम्ही हे तोडलेले दुभाजक बंद करू.”