चितळे बंधूंचे नवीन फॅक्टरी आउटलेट खेड शिवापूर येथे सुरु
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 13 : मराठी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नवीन फॅक्टरी आउटलेटचा येथील पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर-बाग (ता.हवेली) येथे शुभारंभ करण्यात आला. श्री. संजय चितळे, श्री. केदार चितळे व श्री इंद्रनील चितळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
चितळे बंधू यांची बाकरवडी आणि मिठाई उत्पादने प्रसिद्ध आहेत. ही उत्पादने पुणे सातारा रस्त्यावर खवैय्यांसाठी उपलब्ध व्हावीत यासाठी नुकतेच हे फॅक्टरी आउटलेट सुरु करण्यात आले आहे. खेड-शिवापूर (बाग) येथे कैलास भेळ शेजारी हे नवीन फॅक्टरी आउटलेट आहे. त्यामुळे आता चितळे बंधू यांची उत्पाद
ने आता खेड-शिवापूर परीसरातील नागरीक आणि पुणे सातारा रस्त्यावर प्रवास करणारे नागरीक यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
खेड-शिवापूर येथील प्रतुल कोंडे आणि कुटुंबीय यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे.