फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सोडली “महाराष्ट्राची हास्यजत्रा”

0

पुणे फास्ट 24 :

मुंबई, ता. 10: महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त जगभरात प्रसिध्द व असंख्य चाहते असलेला सोनी मराठी चॅनलवर चा विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता गौरव मोरे. हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख गौरव मोरेला मिळाली.
हजारो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचं काम गौरव ने केले त्याच खरं कारण म्हणजे त्याच्या कडे असलेलं विनोदाचं अचूक टायमिंग.

सुरुवातीच्या काळात प्रचंड कष्ट आणि मेहनत करून गौरवने आज हे मोठं यश मिळवलं आहे. मात्र, आता गौरवने वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे.
मागील बरेच दिवसांपासून गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये झळकत नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाचे असंख्य चाहते हास्यजत्रेचे एपिसोड पाहताना
या फिल्टरपाड्याच्या बच्चनला मिस करत होते. शेवटी गौरव मोरे ने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केलं आहे. तो म्हणतो…

नमस्कार! मी गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा…
Ta na na na na naaaaaa

आरा बाप मरतो का काय मी….ये बच्ची……
रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत…मला सांगताना खूप वाईट वाटतंय की, मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो.. माध्यमसारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना… नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!