काम सुरु असतानाच कोसळली भींत; कोंढणपूर येथील प्रकार
काम सुरु असतानाच कोसळली भींत; कोंढणपूर येथील प्रकार
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 14 : कोंढणपूर (ता. हवेली) गावात तुकाई माता मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत सुरु असलेल्या सीमा भिंतीचे काम सुरु असतानाच या भिंतीचा पाया कोसळून भगदाड पडले आहे. त्यामुळे सदर काम निकृष्ट पद्धतीने सुरु असल्याचा आरोप कोंढणपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुजुमले यांनी केला आहे.
कोंढणपूर येथे तुकाई मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे. सदर मंदिरामुळे कोंढणपूर गावाला तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. सध्या या मंदिर परीसरात सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. त्याअन्तर्गत गायमुखाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीमा भिंतीचे काम सुरु आहे. मात्र या भिंतीचे काम सुरु असतानाच या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे सदर काम निकृष्ट पद्धतीने सुरु असल्याचा आरोप कोंढणपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुजुमले यांनी केला आहे.
“वारंवार पाठपुरावा करून या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अशा पद्धतीने ठेकेदार निकृष्ट पद्धतीने काम करत आहेत. त्याला वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसेल तर आम्ही आंदोलन करणार आहोत.”
-संदीप मुजुमले
-माजी सरपंच ग्रामपंचायत, कोंढणपूर
याबाबत ठेकेदार स्वप्नील बोरगे म्हणाले, “पूर्वीच्या जुन्या भिंतीवर बांधकाम चढविण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे या भिंतीचा भाग कोसळला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येईल.”