मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेशाच्या निर्णयाचा भीम सैनिकांकडून निषेध
पुणे फास्ट 24 न्यूज
प्रतिनिधी
खेड-शिवापूर, ता. 2 : राज्य शासनाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भोर-राजगड आणि हवेली तालुक्यातील भीमसैनिकांनी निषेध केला. त्या निषेधार्थ रविवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर भीम सैनिकांनी आंदोलन केले.
मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भोर-राजगड आणि हवेली तालुक्यातील भीमसैनिकांनी रविवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन केले. सकाळी अकरा वाजता टोल नाक्यावर मोठ्या संख्येने भीम सैनिक जमा झाले होते.
“राज्य सरकार जातीयवादी सरकार आहे. त्यामुळेच शालेय अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक मनुस्मृतीचा समावेश करत आहे. मात्र आम्ही त्याचा निषेध करत असून मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यास आमचा विरोध आहे,” असे मत यावेळी उपस्थित भीम सैनिकांनी व्यक्त केले.
प्रवीण ओव्हाळ, महेंद्र साळुंखे, किशोर अमोलिक, नवनाथ कदम, सागर जगताप, विनोद गायकवाड, राजेश कासारे, पप्पू कांबळे, आकाश कांबळे, अभिषेक वैराट, शितल कांबळे, मुन्ना गायकवाड,अमोल गायकवाड, तुषार कांबळे, बाळासाहेब साळवे, संतोष साळवे, संदीप कांबळे, दादा शेलार, संतोष जाधव, अरुण रणखांबे,आनंद खुडे, शेखर ओव्हाळ, किरण यादव आदी यावेळी उपस्थित होते.