खडकवासला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणणार – नवनाथ पारगे
पुणे फास्ट 24 न्यूज : महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 12 : विधानसभेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही विधानसभांची चाचपणी करण्यात येत आहे. खडकवासला मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत नवनाथ पारगे इच्छुक आहेत.
पुण्यात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिव स्वराज्य यात्रा सभेत हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन पारगे यांनी आपली ताकद दाखवून दिली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा पाठिंबा पाहायला मिळाला. डोणजे ते नवले ब्रिज शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली.
शिवस्वराज्य यात्रेला कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येसह पारगे उपस्थित होते. त्यामुळे
खडकवासला विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांच्या यादीत सध्या तरी पारगे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच परिवर्तन घडवून येणार, असे नवनाथ पारगे यांनी सांगितले.