Pune : इंदापूरात महाविद्यालयासमोर तरुणावर गोळीबार! अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीला केले गजाआड
पुणेफास्ट २४
इंदापूर, ता. ०१ : इंदापुरात महाविद्यालयासमोर सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात अज्ञात व्यक्तीने चार राऊंड फायर केले. यापैकी तीन राऊंड राहुल चव्हाण याला लागले आहेत. या गोळीबारात राहुल चव्हाण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले. जखमी राहुल यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इंदापूरात अज्ञाताचा तरुणावर गोळीबार घटनेत तरुण गंभीर जखमी इंदापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासातचं वालचंदनगर येथून ताब्यात घेतल आहे. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. याचवेळी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. धिरज ऊर्फ सोन्या चोरमले असून तो शिरसोडी मधील आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. तर आरोपी कडून पोलिसांनी एक पिस्तूल ही ताब्यात घेण्यात आली आहे.
इंदापूर शहरातील आय काॅलेजसमोर सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती. यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झाला आहे. बारामती मधील घटना ताजी असताना पुण्याच्या इंदापुरामध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या नंतर पोलिसांनी दौंड, यवत, वालचंदनगर, सोलापूर ग्रामीण शहर धाराशिव भागात नाकाबंदी केली होती.
या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. व जखमी तरुणावर इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची देखील भेट घेतली आहे.