जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवभूमी विद्यालयाच्या मुलींची बाजी
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा राजू तोरण कुस्ती संकुल विंझर या ठिकाणी नुकताच पार पडल्या. या स्पर्धेत शिवापूर (ता. हवेली) येथील शिवभूमी विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारली.
या कुस्ती स्पर्धेत 14,17 आणि 19 वर्षे वय गटातून जिल्ह्यातून एकूण 239 मुले व मुली सहभाग झाली होती.
19 वर्ष गटात –
57 kg समृद्धी बडदे (प्रथम क्रमांक)
59 kg सुप्रिया डिंबळे (प्रथम क्रमांक)
या दोघींची विभागीय पातळीवर निवड.
50 kg – आदिती कोंडे (द्वितीय क्रमांक)
53 kg – समीक्षा दर्डीगे (तृतीय क्रमांक)
55 kg – अवंती यादव (तृतीय क्रमांक)
63 kg – श्रद्धा शिंदे (तृतीय क्रमांक)
17 वर्ष वयोगट –
49 kg – सुहानी ओव्हाळ (तृतीय क्रमांक)
65 kg – स्नेहा दिघे ( तृतीय क्रमांक)
तसेच मुलांच्या गटात-
79 kg – प्रणव कोंडे (द्वितीय क्रमांक)
57 kg – यश मुजुमले , सुजल चोरघे (तृतीय क्रमांक).
या मुलींचे नंबर आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे यांनी व संस्थेचे सचिव संग्राम दादा कोंडे यांनी मुलींचे आभार मानले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेवेळी क्रीडा अधिकारी शिवाजीराव कोळी व संतोष आप्पा दसवडकर (मा .पंचायत समिती सदस्य) उपस्थित होते. या मुला मुलींना क्रीडा शिक्षक लक्ष्मण सणस यांनी मार्गदर्शन केले होते. यानंतर विभागीय स्पर्धा नागेश्वर मंगल कार्यालय भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.