प्रथम शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन
हडपसर येथील प्रथम शिक्षण मंडळ संस्थेच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रम अध्यक्ष स्थानी दिलीप शंकर तुपे हे होते.
प्रमुख पाहुणे वैभव डांगमाळी,रियाज खान चाचा, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शुभांगी कांबळे, अश्विनी मॅडम, तसेच परिसरातील नगरीक, संस्थेतील विध्यार्थी उपस्थित होते. तुपे यांनी महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढयातील योगदान, इंग्रजान बरोबर दिलेला लढा भारत स्वातंत्र्य चळवळ, चले जाव, चळवळी बद्दल माहिती दिली ज्ञानेश्वर कांबळे यांनी सर्वांना अहिंसेच्या मार्गाने चालण्याची शपथ दिली. करायमाचे सूत्रसंचालन शुभांगी कांबळे यांनी केले. व श्री वैभव डांगमाळी यांनी आभार मानले