सेवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास मुहूर्त मिळेना

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 11 : पाऊस उघडून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना पुणे सातारा रस्त्यावरील वेळू फाटा येथील सेवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरीकांना खड्डयातून प्रवास करावा लागतो आहे.
काही महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने पुणे सातारा रस्त्यावरील वेळू फाटा येथील सुमारे एक किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाऊस उघडून आता सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांना येथील खड्डे बुजविण्यासाठी मुहुर्त मिळालेला नाही.
त्यामुळे येथून ये-जा करताना कामगार वर्ग, स्थानिक नागरीक आणि शाळकरी विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. तरी येथील सेवा रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

“येत्या दोन दिवसात येथील सेवा रस्त्यावरील खड्डे बजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल,” असे रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी यांनी सांगितले.
ड्रेनेज लाईनही तुंबलेली
वेळू फाट्यावर सातारा ते पुणे या बाजूकडील सेवा रस्त्यालगत ड्रेनेज लाईन आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे. त्यामुळे येथील ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली आहे.