गोगलवाडीत विविध विकासकामांचा शुभारंभ

पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापूर, ता. 14 : “गावात विकासकामांसाठी ईतरांनी आणलेला निधी आपण आणल्याचे सांगून लोकप्रतिनिधींनी त्याचे श्रेय घेऊ नये,” असे मत खडकवासला विधानसभा मतदार संघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

गोगलवाडी (ता. हवेली) गावात सुमारे 11 कोटी 27 लाख रूपयांच्या निधितून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला. यावेळी उपस्थित शरदचंद्र
पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी बोलत होते.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, गोगलवाडी गावच्या सरपंच अश्विनी गोगावले, माजी सरपंच अशोक गोगावले, जितेंद्र कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.