भोरमध्ये थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

0

महायुतीचे शंकर मांडेकर यांचा अनपेक्षित दणदणीत विजय

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर
, ता. 24 : भोर विधानसभा मतदार संघात उमदेवार बदलाची यशस्वी खेळी महायुतीने खेळली आणि ती यशस्वी केली. त्यात अधिकृत पक्षाची उमेदवारी मुळशीला मिळाली आणि त्याचा फायदा करत अगदी पहिल्या फेरीपासून मुळशीकरांनी मांडेकर यांना मतांची आघाडी दिली. मुळशीतील मतांची ही आघाडी भोर-राजगडमध्येही ही आघाडी तोडता आली नाही.

जाहिरात

मांडेकर यांनी भोरचा थोपटे यांचा बालेकिल्ला 20108 मतांनी जिंकून महायुतीच्या विजयाचा झेंडा रोवला.
महाराष्ट्रात निवडणुका जाहिर होऊन अर्ज भरण्याचा कालावधी सुरु झाला होता. मात्र तरीही महायुतीकडून भोर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहिर केली नव्हती. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळणार त्या उमेदवाराला प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळणार होता. तर दुसरीकडे संग्राम थोपटे यांनी प्रचारही सुरु केला होता. त्यामुळे थोपटे यांचे पारडे जड मानले जात होते. तर अखेर शेवटच्या क्षणी महायुतीतील इच्छुकांना बाजूला ठेवून उबाठा मधुन इच्छुक असलेले मुळशीतील शंकर मांडेकर यांना अजीत पवार गटात घेत महायुतीने मांडेकर यांना उमेदवारी दिली.

जाहिरात


मांडेकर यांना उमेदवारी जाहिर होताच महायुतीतील कुलदीप कोंडे आणि किरण दगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे हे दोन्ही अपक्ष मांडेकर यांची मते खाणार आणि थोपटे यांचा विजय अधिक सोपा होणार, असे आडाखे बांधले जाऊ लागले. मात्र थोपटे यांच्या विरोधात मुळशीतील मांडेकर यांना उमदेवारी दिल्यावर “थोपटे यांना या यावेळची लढाई सोपी नसणार” असा अंदाज ‘पुणे फास्ट 24 न्यूज’ने वर्तवला होता. तसेच भोरचा रखडलेला विकास, अडचणीत असलेला राजगड साखर कारखाना, रखडलेली एमआयडीसी हे मुद्दे प्रचारात गाजले. त्याचप्रमाणे यावेळी भोर विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहिले आणि मतदारांनी भोरमध्ये अनपेक्षित असा बदल घडविला.
मांडेकर यांनी दणदणीत विजय मिळवून थोपटे यांच्या भोरच्या गडाला खिंडार पाडले. आता पुढील पाच वर्षे भोर विधानसभा मतदार संघातील वेगवेगळे प्रश्न सोडविणे हे मांडेकर यांच्यापुढील आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!