विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न
हडपसर, पुणे, ता. ०३ – विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न झाली. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोरक्षनाथ केंदळे सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी सानू देडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या विषयी चारोळ्या सुंदर पद्धतीने सादर केले. ज्योत्स्ना वायदंडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घटना व त्यांचे कार्य याविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली.
विद्यालयातील शिक्षिका कल्पना पैठणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेतला.सर्वांनी शिक्षित होऊन समाजाप्रति असलेले कर्तव्य पूर्णपणे पार पाडावे, हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आपल्या भाषणातून सांगितले. तसेच सर्वाना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य लहू वाघुले सर, गोरक्षनाथ केंदळे,वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, मच्छिन्द्र रकटे, अरविंद शेंडगे, दीपा व्यवहारे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, आशा भोसले, दिपाली शिवरकर, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलिनी गायकवाड, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद, तसेच पूजा धाडगे, कैलास वाडकर, विवेक कांबळे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा ससाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दीपा व्यवहारे यांनी केले.