विठ्ठलराव शिवरकर विद्यालयातील विद्यार्थ्यांची रेसकोर्स मध्ये ‘Know Your Army’ मेळाव्यास भेट
पुणे, ता.०५ : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्याच्या वतीने आयोजित “ नो युअर आर्मी’ 2025” रेसकोर्स येथे भेट दिली.
यामध्ये सशस्त्र दलांचे सामर्थ्य, तांत्रिक प्रगती आणि स्वदेशी क्षमता, लष्करी उपकरणे आणि तंत्रज्ञानाची श्रेणी दाखवकी गेली, जे अभ्यागतांना भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतेची अनोखी झलक पाहण्यास मिळाली.तसेच पायदळ आणि विशेष दलाची उपकरणे, जसे की K-9 वज्र, 155 MM BOFORS, PINAKA आणि SMERCH, T-90 आणि BMP-II टँक, L-7-, ZU-23, आकाश आणि अपग्रेडेड शिल्कासह हवाई संरक्षण प्रणाली, स्वॉर्म ड्रोन आणि संरक्षण आणि गतिशीलतेमध्ये प्रगती दर्शविणारी नव्याने समाविष्ट वाहने यांचा प्रदर्शनात समाविष्ट होता.
स्वदेशी उपकरणांच्या उत्पादनावर प्रकाश टाकणारा एक समर्पित विभाग., भारतीय लष्कराच्या क्षमता प्रदर्शित करणारे एक तल्लीन छायाचित्र प्रदर्शन तसेच मार्शल म्युझिक, मार्शल आर्ट, आर्मी डॉग शो, हॉर्स शो, इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विभागाची माहिती घेऊन नोंदविली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आर्मी मध्ये जाण्यासाठी आवश्यक शैक्षणिक माहिती hi विचारली व भविष्यात सैनिक बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
सदर मेळाव्याचे नियोजन गोरक्षनाथ केंदळे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, नलिनी गायकवाड यांनी केले.