बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला

लिलावती रुग्णालयात उपचार सुरु
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
मुंबई, ता. 16 : बॉलीवुड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैफ अली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी गुरुवारी पहाटे 2: 30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी पहाटे सैफ अली खान आपल्या कुटुंबासोबत झोपला असताना हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर हल्ला करणारा पळून गेला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या चाकू हल्ल्यात त्याच्यावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत. त्यातील दोन जखमा गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.