वेळूत 26 जानेवारीला निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कीर्तनसेवा

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 25 : अमोलभाऊ पांगारे युवा मंच वेळू (ता. भोर) यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त एक दिवसीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
रविवार, ता.26) रात्री नऊ ते अकरा या वेळेत वेळू गावात माळवाडी (नंदीवाला माळ) याठिकाणी ही कीर्तन सेवा होणार आहे. श्री. अमोल भाऊ पांगारे युवा मंच यांनी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. अमोल भाऊ पांगारे युवा मंच यांनी केले आहे.