दुचाकी चालकांना हेल्मेटचे वाटप

दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि पी एस टोल रोड प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 28 : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियना अंतर्गत दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि पी एस टोल रोड प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकी वाहन चालकांना नुकतेच हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल प्लाझा येथील ‘पीएसटीआरपीएल’च्या कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियना अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“पोलिस दंड आकारतात म्हणून हेल्मेट परिधान करायचे नाही तर प्रत्येकाने आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरले पाहिजे. असे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सिद्धेश भांगे, व्यवस्थापिका कृपा चव्हाण, शंकर मसाले – उपव्यवस्थापक, संतोष कटके असिस्टंट मॅनेजर, संतोष चोरमले, पी एस टोल अधिकारी अमित भाटिया, अनिल राठोड, अनिल सिंघ, राकेश कोळी, अभिजित गायकवाड, संकेत गांधी, मोहन धुमाळ, आकाश चोरघे आदी यावेळी उपस्थित होते.