महावितरणच्या अघोषित भारनियमनाने व्यावसायिक आणि नागरीक त्रस्त

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 28 : कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणकडून गेल्या अनेक दिवसांपासून वेळू विभागात वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या अघोषित भारनियमनाला आणि मनाच्या कारभाराने या भागातील व्यावसायिक आणि नागरीक त्रस्त झाले आहेत.
महावितरणच्या वेळू विभागात गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने या भागातील व्यावसायिकांना आपल्या कामाच्या तासांचे नियोजन आखता येत नाही. तर विजेच्या या लपंडावामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरीकही त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित केला जातो, त्याची पूर्वकल्पना नागरीकांना दिली जात नाही. महावितरणच्या या नियोजनशून्य अघोषित भारनियमनाला नागरीक वैतागले आहेत.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ओव्हर लोड असल्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र वीज पुरवठा खंडित होणार असल्याची पूर्वसूचना का देण्यात येत नाही? असा सवाल नागरीक विचारत आहेत.