वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा

हडपसर, ता. २८: वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा यांच्यासह एकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हडपसर भागातील मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत.