विठ्ठलराव शिवरकर विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

0

हडपसर, पुणे – विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. आबासाहेब कापरे (मा. व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक – साधना सहकारी बँक, हडपसर, पुणे) यांच्या शुभहस्ते तसेच विठ्ठलराव सातव ( सामाजिक कार्यकर्ते, हडपसर, पुणे ), ॲड. तात्यासाहेब शेवाळे ( सामाजिक कार्यकर्ते, पुणे), माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर (अध्यक्ष- विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान,पुणे ), चंद्रकांत ससाणे सर (सचिव -विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), दत्तोबा जांभूळकर (सरपंच -वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, पुणे ), विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.तसेच शालेय लेझीम पथकाने सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव सातव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे बहुजनांना जगण्याचा अधिकार मिळाला तसेच शिक्षण, नोकरी या ठिकाणी त्यांना संधी प्राप्त झाल्याचे सांगितले. आज हेच संविधान टिकवून ठेवण्याची आज गरज असल्याचे सांगितले.
साधना सहकारी बँकेचे मा. व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक आबासाहेब कापरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रचित संविधानामुळे खऱ्या अर्थाने स्वतंत्र व धर्मनिरपेक्ष भारत घडला असल्याचे सांगितले. घटनेचा स्वीकार व आदर सर्वांनी करावा, तरच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा होईल, असे सांगितले.
मा. नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी शालेय सुशोभीकरण व सुंदर सादरीकरणाबाबत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यालयाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवरकर साहेब यांचा विद्यालयाच्या स्थापनेमागील हेतू स्पष्ट केला. शाळेसाठी परिश्रम करून शालेय प्रगतीमध्ये हातभार लावण्याचे कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी श्रीकांत बदाले व दत्ता रणपिसे यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.तसेच आपल्या राष्ट्राला लाभलेल्या संविधानाचा आपण आदर बाळगावा, अशी अपेक्षा व्यक्त केली व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
ॲड. तात्यासाहेब शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज निर्मितीचा इतिहास सांगितला. तसेच घटना निर्मितीचा इतिहास सांगितला. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्यावत करण्यासाठी पुस्तके वाचले पाहिजे, असे सांगितले. वाचनाने विद्यार्थ्यांना खरे ज्ञान प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचन करत असतील तर विद्यालयास सुसज्ज ग्रंथालय करून देण्याचा मानस व्यक्त केला.तसेच एकनिष्ठ, ध्येयनिष्ठ व समाजनिष्ठ पाहुणे आज या कार्यक्रमास आणल्याबद्दल शिवरकर साहेबांचे व सचिवांचे कौतुक केले.
रोटरी क्लब पुणे चे रोटेरियन अजय वाघ यांनी रोटरी क्लब स्थापनेचा इतिहास व कार्याची माहिती सांगितली. तसेच रोटरीच्या विविध उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा मानस असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी रिया बागवान व अनुजा चव्हाण या विद्यार्थिनींनी यथोचित भाषण केले. तसेच बालविद्यार्थी राजवीर शिरसाम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोर्यगाथावर आधारित पोवाड्याचे गायन केले. या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या उत्तम सादरीकरनाकरिता रोख रकमेची बक्षिसे प्राप्त झाली.
याप्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्रीकांत बदाले याने सर्व विद्यार्थी, तसेच पाहुण्यांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.तसेच माजी विद्यार्थी दत्ता रणदिवे याने रोटरी क्लब च्या माध्यमातून विद्यालयास पाणी शुद्धीकरण वॉटर फिल्टर ची भेट दिली.
याप्रसंगी सन्मित्र सहकारी बँकेचे मा. संचालक सतिश गवळी यांनी 15,000 रु. चा धनादेश विद्यालयात ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यास दिला. तर यशवंत झगडे यांनी रु.5000 ची देणगी विद्यालयास दिली.

याप्रसंगी मा. नगरसेविका कविताताई शिवरकर, तसेच मायाताई ससाणे,सोनाली परदेशी, डॉ. गौरी धारिवाल,उर्मिला आरु (अध्यक्षा- महिला कॉंग्रेस, हडपसर, पुणे), शुभांगी फुले, डिंपल रसाळ, सुनिलजी गायकवाड,रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय वाघ, सतिश गवळी, सोपानराव गवळी, सिद्धार्थ परदेशी, रिपूदमन धारिवाल, सिद्धांश परदेशी, ॲड.विजय कोद्रे, ॲड.विजय राऊत, सतिश गिरमे,डॉ.अनिल गाढवे, विशाल हाके, दिनेश गिरमे, शंभू जांभूळकर, रमेश गायकवाड, पुंडलिक गवळी, सिदराम मोहिते, गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, चंद्रकांत तोंडारे, सूर्यकांत देडगे, भरतलाल धर्मावत, नितीन आरु, दशरथ शेवते, सोपानराव गवळी, चंद्रकांत रासगे, विजय चौघुले, सुदामराव जांभूळकर, मनोज शिवरकर, अनंतराव शिवरकर, अशोक शिवरकर, सुरेश शिवरकर, अजिंक्य शिवरकर, वानवडी ग्रामस्थ, पालक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन शिक्षिका दीपा व्यवहारे यांनी केले व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्त्या दीपा जांभूळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!