वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ ; उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश

पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने बेकायदा हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका हाॅटेलचालकाकडून कारवाई न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपये हप्त्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक विशाल पवार याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पाेलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले आहेत.