पुणे सातारा रस्त्यावरखांबावरील वीजेचे दिवे बंद
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 9 : ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज नवीन बोगदा ते वेलू पर्यंत सुमारे अडीज किलोमीटर अंतरावरील खांबावरील वीजेचे दिवे बंद आहेत. हा ट्रान्सफार्मर दुरुस्त होऊन खांबावरील दिवे सुरु होण्यास अजून आठवडाभर कालावधी लागणार आहे. तोपर्यंत प्रवाशांना या अडीज किलोमीटर पट्टयात अंधारातून प्रवास करावा लागणार आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील कात्रज नवीन बोगदा ते वेलुपर्यंत सुमारे अडीज किलोमीटर पट्टयातील खांबावरील वीजेचे दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी सेवा रस्त्यावरुन ये-जा करताना स्थानिक नागरीकांची गैरसोय होत आहे.
“येथील विजेचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला आहे. सदर ट्रान्सफार्मर दुरुस्त होऊन या भगातील खांबावरील वीजेचे दिवे सुरु होण्यास अजून एक आठवड्याचा कालावधी लागेल,” असे रिलायन्स इन्फ्राच्या इलेक्ट्रिक विभागाकडून सांगण्यात आले.