तबल्याचे बोल थांबले जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
पुणे फास्ट 24 न्यूज
मुंबई, ता. 15 : जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेच्या सँन फ्रान्सिस्को शहरात रविवारी रात्री निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ते 73 वर्षाचे होते. झाकीर हुसेन यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपासून झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता.
अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण हृदयविकाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. झाकीर हुसैन यांचे सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले.
झाकीर हुसैन यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.