श्रीमंत सरदार महादजी शिंदे महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’ वारसा दर्शन कार्यक्रम

0

वानवडी, पुणे : श्रीमंत सरदार महादजी शिंदे महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’ वारसा दर्शन कार्यक्रम वानवडी मध्ये पार पडला. यावेळी प्रा मोहनजी शेटे यांनी सरसेनापती, मुत्सद्दी, धार्मिक, राजनीतिज्ञ्, युद्धाकला पारंगत महादजी शिंदे महाराजांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला. पानिपताच्या पराभवने खचून न जाता त्यांनी प्रबळ लष्कर उभारून दिल्ली च्या लाल किल्ल्यावर अनेक वर्षे मराठेशाही व हिंदूपदपत शाहीचा भगवा झेंडा फडकत ठेवला. सैन्याचे आधुनिकीकरण केले. गोहत्या बंदी सारखे महत्त्वाचे कायदे अमलात आणले.

त्यांनी शिंदे छत्री येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिराविषयी देखील माहिती दिली. या वेळी दिनेश उर्फ प्रसाद होले, यशवंत भोसले, त्र्यंबक नवले, सागर नवले, वानवडी व पुणे शहरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!