आर्वीच्या शाळेत PAL लॅबचे उदघाटन

पुणे फास्ट 24 न्यूज
खेड-शिवापूर, ता. 07 : आर्वी (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे जिल्हा परिषद व कॉन्व्हेजिनिअस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती करण्यात आलेल्या PAL लॅबचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. आर्वी गावचे सरपंच सागर नवघणे व माजी सरपंच चेतन जाधव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या लॅबअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्टया उपयुक्त असे 20 टॅब , इंटरनेट सुविधा , लॅब वर्गखोली रंगकाम , खेळणी इत्यादी सुविधा शाळेस प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व आशय समृद्धीकरणासाठी हा प्रकल्प निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी टॅबचा वापर उत्साहाने व कुतूहलाने करत असल्याचे पाहून सर्व उपस्थितांनी सदर प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कॉन्व्हेजिनिअस संस्थेचे मुख्य समन्वयक भीमराव सुरलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष विष्णू आबा घोगरे , आर्वी गावचे मा.उपसरपंच सागर घोगरे, देवा दादा, माता पालक भगिनी तसेच आर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका रिमा बेल्हे, शिक्षक अनिल मुजुमले, अशोक शिंदे, सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.