महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी
पुणे फास्ट 24 न्युज
जेजुरी, ता 8: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. दुपारी एक वाजता जेजुरी गडावरून खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडकोटातून बाहेर पडली.
या वेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी भांडाऱ्याची उधळण केली. यापूर्वी गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या मूर्ती पालखीत आणून ठेवताच शेडा देण्यात आला आणि सोहळ्याला सुरुवात झाली.
कऱ्हा स्नान झाल्यानंतर रात्री पालखी सोहळा खंडोबा गडावर दाखल झाला. ‘रोजमारा’ वाटप केल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी मंडळासह पुजारी, सेवेकरी वर्ग, श्री मार्तंड देवसंस्थान तर्फे सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.