जून्या कात्रज बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळली; सुदैवाने जीवित हानी नाही

0

जून्या कात्रज बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळली

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर
, ता. 26 : कात्रज जुन्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ (शिंदेवाडी हद्दीत) शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. सुदैवाने त्यात कोणाला दुखापत झाली नाही.

शुक्रवारी सकाळी कात्रज जुन्या बोगद्याच्या शिंदेवाडी हद्दीच्या बाजूला दरडीचा काही भाग कोसळला. त्यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र शिंदेवाडी बाजूने बोगद्यात प्रवेश करतानाची एक लेन बंद झाली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु झाल्याने बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडी हद्दीत वाहतूक कोंडी झाली.

सकाळी दहा वाजेपर्यंत ही दरड बाजूला करण्यासाठी कोणती यंत्रणा याठिकाणी आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत जावे लागत होते.

कात्रज जुन्या बोगद्याच्या शिंदेवाडी बाज़ुकडील प्रवेशद्वारावरील दरडी गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक झालेल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला स्थानिकांनी वारंवार कल्पना दिली आहे. मात्र त्यावर त्यांच्याकडून काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता तरी याठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!