खेड शिवापूर येथे महसूल दिनानिमित्त कार्यक्रम

0

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 7 : खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील शिवभूमी विद्यालयात खेड-शिवापूर मंडल अधिकारी कार्यालयाकडून महसूलमधील विविध दाखल्यासंदर्भात नुकतीच माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालय हवेली यांचे मार्फत महसूल पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअतंर्गत खेड-शिवापूर येथील शिवभूमी विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना खेड शिवापूरचे मंडल अधिकारी श्री व्यंकटेश चिरमुल्ला यांनी महसूल मधील वेगवेगळे दाखले यांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिवभूमी विद्यालय चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग तसेच खेड-शिवापूरचे तलाठी चांदपाशा तांबोळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!