चाटे स्कुलच्या प्रज्ज्वल ओंबळेचा कुस्तीत प्रथम क्रमांक
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 26 : हवेली तालुकास्तरीय झालेल्या कुस्ती स्पर्धेत चाटे स्कूलचा विद्यार्थी प्रज्वल ओंबळे याने प्रथम क्रमांक पटकावला. चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फूलचंद चाटे यांच्या हस्ते नुकताच ओंबळे याचा सन्मान करण्यात आला
कोंढणपूर (ता. हवेली) येथील राधिका मंगल कार्यालयात नुकत्याच हवेली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत चाटे स्कुलचा ईयत्ता तील विद्यार्थी प्रज्वल ओंबळे हा सहभागी झाला होता. यावेळी या स्पर्धेत ओंबळे याने 44 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानिमित्त चाटे स्कूलमध्ये नुकताच प्रज्वल ओंबळे याचा चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फूलचंद चाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उद्योजक दिलीप हनमघर पाटील, गाउडदरा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नितिन सुर्वे, माजी अध्यक्ष कैलास ओंबळे आणि शिक्षक वर्ग आदी यावेळी उपस्थित होते.