या परीसरात होतोय अनधिकृत वेश्या व्यवसाय

0

कारवाई करण्याची स्थानिक नागरीकांची मागणी

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापुर, ता. 6 : आंबेगाव बुद्रुक परीसरात सुरु असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता शिंदेवाडी (ता.भोर) परीसरातही येऊन पोचले आहे. येथील जुना जकात नाका परीसरात पुणे सातारा रस्त्यावर अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत असून परीसरातील काही लॉजिंगमध्ये त्यांच्याकडून अनधिकृत वेश्या व्यवसाय केला जात आहे.

गेल्या काही वर्षापासून नवले पूल कात्रज बाह्यवळण महामार्गावर असलेल्या लॉजिंगमध्ये या ठिकाणी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या काही महिलांकडून अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय सुरु आहे. या परीसरात सुरु असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे पुणे सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी (ता.भोर) परीसरात पोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील कात्रज नवीन बोगदा आणि जकात नाका परिसरातील रस्त्यावर अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहतात. येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना हातवारे आणि इशारे करून खुणावतात. त्या या परीसरात असलेल्या काही लॉजिंगमध्ये अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या परीसरात अनेक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये काम करणारा महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या भागात अनेक लोकवस्ती आहेत. त्यामुळे महिला आणि शाळकरी मुलांची येथून ये-जा सुरु असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परीसरात अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत. परीसरात असलेल्या काही लॉजिंग व्यवसायिकांकडून त्याला खतपाणी घातले जात असल्याचे येथील अनेक स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात सुरु झालेल्या या अनधिकृत प्रकारावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.

याबा”या परीसरात असे काही प्रकार सुरु असतील तर सबंधितांवर पोलिसांकड़ून निश्चित कारवाई करण्यात येईल.” राजेश गवळी – राजगड पोलिस निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!