विनयभंग प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल
पुणे फास्ट 24 न्यूज
पुणे, ता. 30 : जागेत बांधकाम करण्याच्या वादावरुन घरात घुसून एका महिलेचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विकास लक्ष्मण पवार याच्यावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. याबाबत 28 वर्षे वयाच्या एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या घराशेजारी बांधकाम सुरु आहे. त्यावरून वाद झाल्याने विकास फिर्यादीच्या घरात शिरला. यावेळी त्याने सबंधित महिलेला धमकावून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. असे या फिर्यादीत म्हटले आहे. राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.