कात्रज घाटात साइड पट्टया खचल्या
साइड पट्टयात वाहने खचून अपघाताचा धोका वाढला
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 21 : पावसाळा सुरु झाला असून कात्रज घाट रस्त्यावरील अनेक ठिकाणी साइड पट्टयातील राडारोडा वाहून गेला आहे. त्यामुळे त्याठिकाणी साईड पट्टयांच्या खड्ड्यात वाहने खचून अपघात होत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबडतोब येथील साईड पट्टया बुजवाव्यात, अशी मागणी नागरीक करत आहेत.
कात्रज घाटाची हद्द जुन्या बोगद्याच्या पलीकडे (हवेली हद्दीत) आणि बोगद्याच्या अलीकडे (भोर हद्द) अशी दोन्ही बाजूला आहे. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शिंदेवाडी हद्दीतील अनेक ठिकाणच्या मुरुम पट्टयातील राडारोडा वाहून गेला आहे. या साईड पट्टयात पावसाने वाहून आलेला चिखल, माती आणि राडारोडा आहे. त्यात येथून जाणारी वाहने खचत आहेत. त्यात वाहनांची चाके खचून अपघात होत आहेत.
शक्रवारी सकाळी एक ट्रक या साइड पट्टयाच्या खड्ड्यात अडकला. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या साइड पट्टया ताबड़तोब बुजवाव्यात, अशी मागणी नागरीक करत आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नकुल रणसिंग म्हणाले, “या खचलेल्या साइड पट्टयाची पाहणी करून त्या ताबड़तोब भरण्यात येतील.”