पुण्यात मुसळधार पाऊस, पुण्याला पुराचा विळखा
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 25 : पुणे परिसरात गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसाने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पुण्यात डेक्कन, पुलाची वाडी, सिंहगड रोड आदी ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. त्यात अनेक कुटुंबे अडकली. तर तीन जणांचा पाण्यात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
गेल्या 24 तासापासुन खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून सुमारे 40 हजार क्यूसेसने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी पहाटेपासून पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यातून वाट काढताना डेक्कन येथे पाण्यात विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला.
तर पुलाची वाडी, सिंहगड रोड येथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली. वाहनेही पुरात अडकली. सुरुवातीला स्थानिक नागरीकांनी या पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. माध्यमांनी या बातम्या दाखवल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आणि मदतकार्यात उतरले. मात्र मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे माहिती असूनही प्रशासनाने आम्हाला सूचना दिल्या नाहीत. याबाबत आम्हाला लवकर समजले असते तर अनेक कुटुंबे पूरात अडकली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीकांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी जाऊन पुण्यातील पूरस्थितीतील मदत कार्याचा आढावा घेतला.
पूर परीस्थितितील ठळक मुद्दे
-खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस
-खकडवासला धरणातून 40 हजार क्युसेसने मुठा नदीत पाणी सोडले
-त्यामुळे डेक्कन, सिंहगड रोड परीसरात पूरस्थिती, अनेक कुटुंबे पुरात अडकली
-पूलाची वाडी येथे पाण्यात विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू
-प्रशासनाने अगोदर सूचना दिल्या नसल्याचा स्थानिकांचा आरोप