खेड-शिवापूर परीसरात बेकायदा गुटखा विक्री जोमात
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 3 : येथील खेड-शिवापूर परीसरातील पान टपऱ्या, हॉटेल आणि किराणा दुकानांमध्ये खुलेआमपणे बेकायदा गुटखा विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे या भागातील अनेक किराणा दुकान व्यावसायिक भागातील किरकोळ विक्रेत्यांना होलसेल गुटख्याची विक्री करत आहेत. बेकायदा गुटखा विक्रीचा परीसरात बाजार भरला असताना अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस यंत्रणा त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. मात्र येथील पुणे सतारा रस्ता आणि खेड-शिवापूर परीसरात मात्र ही गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते. कारण या भागातील पान टपऱ्या, छोटी हॉटेल आणि किराणा दुकानांमध्ये बेकायदा गुटखा विक्री खुलेआम सुरु आहे. शाळा आणि महविद्यालये, पोलिस चौकी यांच्या शेजारी असलेल्या पान टपऱ्यावर खुलेआम गुटखा विक्री सुरु असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे या भागातील काही किराणा व्यावसायिक येथील किरकोळ विक्रेत्यांना होलसेल गुटखा विक्री करत असल्याची चर्चा आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन पान टपऱ्या, हॉटेल्स यांना जगापोच गुटखा विक्री केली जाते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात खुलेआमपणे ही बेकायदा गुटखा विक्री सुरु आहे. तरीही अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.
गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का नाही?
पुणे शहरातही सध्या खुलेआम बेकायदा गुटखा विक्री सुरु आहे. कर्नाटक ते पुणे ही गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक पुणे बेंगलूरु मार्गावरुन होत असेल. मग या मार्गावर गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.