दोन वर्षाच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार

0

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 17 : राजगड पोलिसांच्या हद्दीत पुणे सातारा रस्त्यावरील एका गावातील दोन वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. आरोपी आणि पीडित मुलगी शेजारी राहायला आहेत. मंगळवारी सकाळी पीड़ित मुलीची आई ही कपडे धूत होती. यावेळी आरोपीने या चिमुरडीला आपल्या घरात नेले आणि आतून कडी लावून घेतली. थोड्या वेळाने त्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. यावेळी पिडित मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन केले. यावेळी सदर मुलाने त्या चिमुरडीवर बाललैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.

सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे फिरवून त्यांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!