विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान
आजपासून राज्यात आचारसंहिता लागू
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
मुंबई, ता. 15 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहिर केला. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकाल घोषित केले जाणार आहे.
राज्यातील महत्वाच्या पक्षात फुट पडल्यानंतरची विधानसभेची ही पहिली निवडणुक आहे. त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. त्यानुसार 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहिर करण्यात येणार आहे. विधानसभेची निवडणूक जाहिर झाल्याने आजपासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या- 9.63 कोटी
पुरूष मतदार- 4.97 कोटी
महिला मतदार- 4.66 कोटी
विधानसभेच्या एकूण जागा-288
सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव जागा- 234
अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागा-29
एस टी प्रवर्गासाठी राखीव जागा-25
मतदान- 20 नोव्हेंबर 2024
निकाल- 23 नोव्हेंबर 2024