खेड-शिवापूर परीसरात वाहतूक कोंडीचा बोजवारा

0

दिवाळी पर्यटनाहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर,
ता. 10 : दिवाळी पर्यटनाहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना रविवारी रात्री खेड-शिवापूर परीसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शिवरे फाटा आणि खेड-शिवापूर फाट्यावर तर वाहतूक कोंडीचा प्रचंड बोजवारा उडाला. उलट मार्गिकेवर पुण्याकडे येणारी अनेक वाहने आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जाहिरात

दिवाळी पर्यटनासाठी नागरीक मोठ्या संख्येने कोकण, महाबळेश्वर आदी ठिकाणी गेले होते. रविवारी हे पर्यटनासाठी गेलेले नागरीक पुण्याकडे परतू लागले. त्यामुळे रविवारी दुपारपासून पुणे सातारा रस्त्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढू लागली होती.

जाहिरात

सायंकाळी सहानंतर तर ही गर्दी अधिक वाढली. शिवरे फाटा, खेड-शिवापूर टोलनाका आणि खेड-शिवापूर फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काही वाहन चालक उलट दिशेने पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर आले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!