सेवा रस्ता बनलाय हॉटेल व्यावसायिकांचे वाहनतळ
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 17 : पुणे सातारा रस्त्यावरील सेवा रस्ता हा हॉटेल व्यावसायिकांचे वाहनतळ बनला आहे. खेड-शिवापूर बाग येथील हॉटेल मध्ये आलेली वाहने सेवा रस्त्यावर उभी राहत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.
पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर बाग येथे रविवारी येथील हॉटेल चूल मटण आणि शिवराज ढाबा या हॉटेल मध्ये जेवायला आलेल्या नागरीकांनी त्यांची वाहने येथील सेवा रस्त्यावर उभी केली होती. म्हणजेच येथील सेवा रस्ता हॉटेल व्यावसायिकांनी वाहनतळ बनवला आहे. ही वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तरीही महामार्ग आणि राजगड पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी येथे कायमच सेवा रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.