महावितरणने विना परवानगी खोदली चारीगोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले यांचा आरोप
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 18 : भूमीगत विजेच्या तारा नेण्यासाठी महावितरणने कोणाचीही परवानगी न घेता शिंदेवाडी ते गोगलवाडी रस्त्याच्या बाजूने चारी खोदून वायरींग केलेली आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी महावितरणने शिंदेवाडी येथील एका कंपनीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा भूमिगत नेल्या. त्यासाठी शिंदेवाडी ह हद्दीतील शिंदेवाडी ते गोगलवाडी रस्त्याच्या कडेला चारी खोदली आहे.
याबाबत गोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले म्हणाले, “ही चारी खोदताना महावितरणने कोणाचीही परवानगी घेतलेली नाही. तसेच याठिकाणी मुळातच अरूंद रस्ता आहे. या खोदल्यामुळे हा रस्ता अजून अरूंद झाला आहे. त्यामुळे सदर चारी खोदणाऱ्या महावितरणच्या अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.”
“शासनाच्या योजनेनुसार ग्राहकाला भूमिगत वीजे पुरवठा घेण्याचा अधिकार आहे. तसेच ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन आम्ही हे काम केले आहे.”
-अभिजीत भोसले
-कनिष्ठ अभियंता महावितरण (वेळू विभाग)