तापकीर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर
, ता. 24 : गेल्यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघात निसटता विजय मिळवावा लागलेल्या आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी जोरदार मुसंडी मारत विजयाचा चौकार लगावला. तापकीर यांनी 52 हजार 322 मतांनी दोडके यांचा दणदणीत पराभव केला. सलग चौथ्यांदा निवडून आल्याने तापकीर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

पुण्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहिर झाली. त्यात आमदार भीमराव तापकीर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपाकडून उमेदवारी बदलली जाणार, असा कयास बांधला जात होता. मात्र अखेरच्या क्षणी जाहिर झालेल्या भाजपच्या उर्वरित यादीत तापकीर यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सचिन दोडके यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर खडकवासला विधानसभा मतदार संघातील मनसेचे माजी आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे यांना मनसेने खड़कवासला विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरवले. त्यामुळे यावेळी खडकवासल्याची लढत तिरंगी ठरली.

जाहिरात

गतवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दोडके यांनाच उमदेवारी देण्यात आली. मात्र गतवेळी निवडणूक झाल्यानंतर दोडके यांचा मतदार संघात जनसंपर्क तुटला होता. त्याचबरोबर मनसेचे मयूरेश वांजळे यांच्या उमेदवारीचा फटकाही दोडके यांना बसला. तर गतवेळीपेक्षा जोरदार मुसंडी मारत तापकीर यांनी दोडके यांचा 52 हजार 322 मतांनी पराभव केला. तापकीर हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी तापकीर यांच्या रूपाने पुण्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!