जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी
डॉ. सुहास दिवसे नवे जमाबंदी आयुक्त
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 2 : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जितेंद्र डुडी हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे जिल्हाधिकारी पदावरुन डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली आहे.
दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (पुणे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.