कोथिंबीरीची दुप्पट दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 18 : शेतकऱ्यांच्या कोथींबीरीला मिळालेल्या बाजारभावाच्या दुप्पट दराने बाजार समितीच्या आवारातच कोथींबीरीची विक्री करण्यात येत असल्याचे वृत्त ‘पुणे फास्ट 24 न्यूज’ने दिले होते. या वृत्ताची दखल घेत बाजार समितीने समितीच्या आवारात कोथींबीरीची दुप्पट दराने विक्री करणाऱ्या डमी आडत्यांवर मंगळवारी कारवाई केली.
सध्या पाऊस पडला असून शेतमालाचे भाव वधारले आहेत. त्यातही कोथींबीरीचे भाव जास्त वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात आढावा घेतला. यावेळी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळावर शेतकऱ्याच्या कोथींबरीला मिळालेला भाव प्रती गड्डी 10 ते 35 रुपये इतका होता. तर त्याच बाजार समितीच्या आवारात डमी आडते कोथींबीर 50 ते 60 रुपये गड्डी विकताना आढळून आले. त्याचे वृत्त ‘पुणे फास्ट 24 न्यूज’ने दिले होते.
त्याची दखल घेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगळवारी कोथींबरीची दुप्पट दराने विक्री करणाऱ्या डमी आडत्यांवर कारवाई केली. यावेळी 4 डमी आडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 335 कोथींबर गड्डी जप्त करण्यात आली.
दिखाव्यापुरती कारवाई नको
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने डमी आडत्यांवर कारवाई केली ही चांगली गोष्ट आहे. मात्र ही कारवाई यापुढे कायम राहिली पाहिजे, असे मत नवविकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पवार यांनी सांगितले.