‘श्रीयश’ची रुग्ण सेवेची यशस्वी दहा वर्षे;
श्रीयश- खेड-शिवापूर परीसरातील विश्वसनीय हॉस्पिटल
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 12 : येथील श्रीयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुढ़ी पाडव्याला हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुमारे दहा वर्षापूर्वी पुणे सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर येथे श्रीयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते. डॉ. अतुल भोसले, डॉ. अमोल वैद्य आणि डॉ. प्रशांत कासले या तीन तरुण डॉक्टरांनी एकत्र येत खेड-शिवापूर येथे हे हॉस्पिटल सुरु केले. गेली दहा वर्षे अखंडपणे सेवा देत त्यांनी रुग्णसेवेची दहा वर्षे पूर्ण केली.
श्रीयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे या भागातील अनेक जणांचे जणू फॅमिली हॉस्पिटल आहे. योग्य दरात चांगले उपचार ही श्रीयश हॉस्पिटलची खासियत आहे. त्यामुळेच आपल्या उत्तम सेवेच्या आधारे त्यांनी रुग्णसेवेची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. या दहा वर्षात हजारो रुगणांवर याठिकाणी उपचार झाले आहेत. आधुनिक उपचार पद्धती आणि सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला योग्य दरात आधुनिक उपचार जवळ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने आम्ही दहा वर्षापूर्वी हे हॉस्पिटल सुरु केले. रुगनांची कोणतीही अडवणुक न करता आम्ही सेवा देत आहोत. अनेक गरीब व गरजू लोकांची अड़चण समजून त्यांना योग्य उपचार केले आहेत. या दहा वर्षात लोकांमध्ये आमची विश्वासाहर्ता वाढली आहे. त्यामुळे साहजिकच आमचीही जबाबदारी वाढली आहे. म्हणून यापुढील काळात अजून चांगल्या पद्धतीने लोकांना उपचार देण्याचा आमचा मानस आहे,” असे श्रीयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. अतुल भोसले, डॉ. अमोल वैद्य आणि डॉ. प्रशांत कासले यांनी सांगितले.