जलतरण पटू तन्वी चव्हाण देवरे यांनी सह्यादी अतिथीगृहात घेतली मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट
मुंबई, ता. २६: जगातील सर्वात कठीण इंग्लिश चॅनेलचा (खाडी) जलतरण प्रवास पार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील जलतरण पटू तन्वी चव्हाण देवरे यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांना रुपये पाच लाखाचा धनादेश जाहीर करण्यात आला.
तन्वी चव्हाण देवरे यांनी डोव्हर (यूके) ते फ्रान्स (42 किमी) हे अंतर 17 तास 41 मिनिटांत पूर्ण केले. हे साध्य करणाऱ्या दोन मुलांची माता असलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगातील सर्वात कठीण जलतरण प्रवास पार केल्याबद्दल तन्वी यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या!