ज्ञानच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवेल- प्रा. फुलचंद चाटे
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
पुणे, ता. 26 : “विद्यार्थीदशेमध्ये आपल्याला कसे जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करता येईल याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांकडे ज्ञान असेल तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल बनू शकेल,” असे प्रतिपादन चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फूलचंद चाटे यांनी केले.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षा लवकर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.
चाटे म्हणाले, “यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. तसेच विद्यार्थीदशेमध्ये आपल्याला कसे जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करता येईल याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मोबाईल च्या काळात मोबाईल पेक्षा अभ्यास महत्वाचा आहे हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याबरोबरच पाल्यांनी आपल्या पालकांचा आदर करणेही महत्वाचे आहे.”
चाटे शिक्षण समूहामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्याला झेपेल अशाच पद्धतीने विद्यार्थी घडवण्यावर भर दिला जातो. चाटे शिक्षण समूहाचे हजारो विद्यार्थी देश-परदेशात प्रभावीपणे काम करत आहेत, असेही चाटे यांनी यावेळी सांगितले.