पुणे सातारा रस्त्यावर ट्रॉमा सेंटर तर खेड-शिवापूरला शव विच्छेदन गृह सुरु करण्याचा विचार
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांचे मत
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 3 : “पुणे सातारा रस्त्यावर चेलाडी परीसरात ट्रॉमा सेंटर आणि खेड-शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह सुरु करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल,” असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी येथे दिले.
पुणे सातारा रस्त्यावरुन अबिटकर यांचा ताफा चाललेला असताना खेड-शिवापूर येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी अबिटकर यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवसेना नेते कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, संजय दिघे, राजाभाऊ सट्टे, राकेश गाडे, अमोल कोंडे, लाडू शेठ कोंडे, सागर काका कोंडे, राजाभाऊ सणस, डॉ. पी. एस. शिंदे, डॉ. विजय काळे आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर चेलाडी फाट्या दरम्यान ट्रॉमा सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच भोर आणि हवेली तालुक्यातील पोलिस प्रशासनाला शवविच्छेदनासाठी ससून आणि भोरला जावे लागते. मात्र ही ठिकाणे दूर असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांच्या सोईसाठी खेड-शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह सुरु करण्याची गरज आहे, असे कोंडे यांनी यावेळी अबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर बोलताना अबिटकर म्हणाले, “तुमच्या या दोन्ही मागण्या गरजेच्या आहेत. या संदर्भात आपण निवेदन द्यावे. त्यानुसार सदर ठिकाणी ट्रॉमा सेंटर आणि शवविच्छेदन केंद्र सुरु करण्यासाठी निश्चित विचार करण्यात येईल.”