हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी “अमोल मोरे” यांची बिनविरोध निवड
पुणे फास्ट 24 न्यूज
महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर, ता. 7 : हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी अमोल पंढरीनाथ मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. मोरे हे शिवगंगा खोऱ्यातील मोरदरी (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणी प्रतिष्ठेची समजली जाते. नुकतीच संघाच्या झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यात सरचिटणीसपदी अमोल पंढरीनाथ मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोरे यांच्या रूपाने तरुण, तडफदार नेतृत्वाला सरचिटणीसपदी संधी मिळाली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, तालुका संघ नेते राजेशजी काळभोर, मा.अध्यक्ष रमेशदादा कुंजीर,
नेते सुरेशजी कटके, मा. चेअरमन प्रकाश चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक मराठे यांनी संपूर्ण कार्यकारणीची निवड जाहीर केली.
या प्रसंगी शिवगंगा खोऱ्यासह संपूर्ण हवेली तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.